पावसाचा जोर वाढणार ; ‘या’ सात जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट

red alert

मुंबई : महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने राज्यात पाऊस जोर धरणार आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी मंगळवारी भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला. येत्या दोन दिवसांत या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस पडेल, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे. रेड अलर्टमध्ये राज्यातील ७ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये कोकणातील पाच आणि पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्हे आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. रेड अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.उद्या २२ जुलै रोजी सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

तर २३ जुलै रोजी सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी,पालघर, मुंबई, ठाणे, चंद्रपूर सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तसेच यवतमाळ, वाशिम आणि वर्धा जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, आज वसई-विरार नालासोपारा परिसरात मुसळधार पाऊस झाला असून, रस्त्यांवर 2 फुटांपर्यंत पाणी साचल्याचे दिसून येत आहे. दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस होतो आहे. गोरेगाव, अंधेरी, वांद्रे, परळमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतूक अद्याप सुरळीत सुरु आहे. तर मुंबईला पाणीपुरवठा करणारी मिठी नदीही तुडूंब भरुन वाहत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP