भुजबळ समर्थकांकडून राज्यभरात ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्रम

bhujbal

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीकडून चौकशीच्या नावाखाली कारागृहात डांबून ठेवले असल्याचा आरोप भुजबळ समर्थकांचा आहे. त्यांच्यावर न्यायालयामध्ये अद्यापही कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. मात्र गेल्या २२ महिन्यांपासून शासनाच्या चौकशी यंत्रणेने केवळ चौकशीच्या नावाखाली त्यांना कारागृहात डांबून ठेवले. त्यामुळे भुजबळ समर्थक जोडो अभियानांतर्गत ‘अन्याय पे चर्चा’ हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.

या आधी देशभर तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भुजबळ समर्थकांकडून निदर्शने व सत्याग्रह आंदोलन करत शक्तीप्रदर्शन केले होते. त्यावेळी पिवळे झेंडे, काळे कपडे आणि ‘मी भुजबळ’ अशा टोप्या घालून हजारो समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसही रस्त्यावर उतरले होते. भुजबळांची तातडीने सुटका करावी अशी मागणी त्यावेळी आदोलकांनी केली होती. आता पुन्हा भुजबळ समर्थक अन्याय पे चर्चा’ हा कार्यक्रम राज्यभरात घेणार आहेत.

छगन भुजबळ यांच्यावर अन्याय होत असून अन्यायाच्या निषेधार्थ भुजबळ समर्थक जोडो अभियानांतर्गत अन्याय पे चर्चा’ हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत लवकरच ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात तसेच शहरातील प्रभागांमध्ये भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ अन्याय पे चर्चा’ हा अभिनव कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावर अन्याय पे महाचर्चा’ हा कार्यक्रम आयोजित केला जाईल असे भुजबळ समर्थक समन्वय समितीचे समन्वयक दिलीप खैरे व बाळासाहेब कर्डक यांनी स्पष्ट केलं.

IMP