वारीसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार अॅपद्वारे मिळणार इतंभूत माहिती

blank

 टीम महाराष्ट्र देशा : टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा-तुकारामाची पालखी सकाळी पाच वाजेच्या सुमारास पुण्याकडे प्रस्थान झाली. वारकर्यांमध्ये प्रचंड उत्साह हा ओसडून वाहतो आहे. यावर्षी लोकप्रतिनिधींच्यावतीने दिंडी प्रमुखांना पावसापासून संरक्षणासाठी ताडपत्री भेट देण्यात आली.

ज्ञानोबा माऊलीच्या पालखीचं प्रस्थान आज आळंदीहून निघेल आणि पुण्यातील भवानी पेठेतील निवडूंग विठोबा मंदिरात मुक्कामी राहील. संत तुकाराम महाराजांची पालखी आज आकुर्डीहुन निघेल आणि नाना पेठेत मुक्कामी राहील. या दोन्ही पालखी आज पुण्यात असणार आहे.

आषाढी वारीनिमित्त २०१८ हे अॅप जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आले आहे. त्यात वारीमार्गात पालख्या कोठे आहेत याची माहिती मिळेल.

• तसेच हरवलेल्या व्यक्तींबाबतची माहितीही त्यावर मिळणार असून वारीच्या काळात वारकऱ्यांना योग्यवेळी मदत मिळण्याबरोबरच अन्य माहितीही या अॅपद्वारे देण्यात येणार आहे.
• आपत्कालीन परिस्थितीमध्ये भाविकांना महत्त्वाचे संदेश, पालखी मार्गावरील वाहतुकीची व्यवस्था आणि पंढरपूर येथून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याचे थेट प्रक्षेपण या अॅपद्वारे केले जाणार आहे.
• अॅपमध्ये पालखी मार्गातील विसाव्याची ठिकाणे, पाणी पुरवठय़ाचे ठिकाण, समन्वय कक्ष, गॅस आणि केरोसिन मिळण्याचे ठिकाण, टँकरची सुविधा, शौचालय आदी ठिकाणांचे जीपीएस लोकेशन देण्यात आले आहे.
• वारीमध्ये संपर्कासाठी मोबाईलचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. त्यामुळे पालखी मार्गस्थ होत असलेल्या भागातील भ्रमणध्वनी जंक्शन क्षमता वाढविण्यासाठी आणि मोबाइल टॉवर उभारण्याबाबत मोबाईल कंपन्यांना निर्देश दिले आहेत, असेही उदयसिंह भोसले यांनी सांगितले.

प्रत्येक पालखी मुक्कामी कक्ष
पालखी मार्गावरील प्रत्येक पालखी मुक्कामाच्या ठिकाणी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक प्रांत अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. हे समन्वय कक्ष चोवीस तास सुरू राहणार असून कक्षासाठी पोलीस निरीक्षक दर्जाच्या स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.

पालखीत सहभागी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी समन्वय कक्षात महसूल, आरोग्य, पाणीपुरवठा, पोलीस, स्वच्छता, परिवहन, महावितरण अशा विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी सोहळा स्वच्छ व निर्मल होण्यासाठी निर्मल अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्य़ांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले होते.

सॅमसंग गॅलक्सी A-6+ च्या किंमतीत घट