fbpx

१४ महिने फरार असलेला मोक्का गुन्ह्यातील गुंड जेरबंद

पारनेर / स्वप्नील भालेराव : निघोज गावचे माजी सरपंच संदीप वराळ हत्याकांडातील 14 महिने फरार असलेला मोक्का गुन्ह्यातील आरोपी कुख्यात गुंड पिंट्या ऊर्फ भाऊ आनंदा रसाळ याला पारनेर चे पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार साहेब,पोलीस हेडकॉन्सटेबल चव्हाण, पोलीस नाईक पटेल तसेच निघोज पोलीस दुरक्षेत्राचे धडाडीचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कावडे यांनी जेरबंद केले आहे.

सुनील रघुनाथ पवार यांचेवर ४ जुलै २०१४ रोजी निघोज येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात देखील पिंट्या रसाळ ४ वर्षापासून फरार होता.