भारतीय सर्वेक्षण विभाग नकाशा तयार करण्यसाठी 300 ड्रोनचा करणार वापर

टीम महाराष्ट्र देशा : देशाचा नकाशा तयार करण्यासाठी भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) प्रथमच ड्रोनचा वापर करणार आहे. विभागाने ड्रोनचा वापर करून नकाशा तयार करण्याचे काम हातात घेतले आहे.योजनेनुसार ड्रोन या अद्ययावत तंत्राचा वापर करून हाय-रिझोल्यूशन असलेले नकाशे तयार करण्यात येणार आहेत. पुढील दोन वर्षांत भारतीय भूप्रदेशाचा एकूण 75% भौगोलिक भाग, म्हणजेच एकूण 3.2 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी सुमारे 2.4 दशलक्ष चौ.किमी.चा नकाशा तयार केला जाणार आहे.

भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) या संस्थेचे मूळ सन 1767 मध्ये आहे. हे भारतातला सर्वांत जुना वैज्ञानिक विभाग आणि जगातल्या सर्वात जुन्या सर्वेक्षण आस्थापनांपैकी एक आहे. सर्व्हेयर जनरल ऑफ इंडिया हे या संस्थेचे प्रमुख आहेत. सध्या हे पद लेफ्टनंट जनरल गिरीश कुमार यांच्याकडे आहे. संस्थेचे मुख्यालय देहारादून (उत्तराखंड) येथे आहे. सध्या सर्वोत्कृष्ट नकाशांचे रिझोल्यूशन (पृथक्करण) 1: 250000 असे आहे, म्हणजेच नकाशावरील 1 सेंटीमीटर हे भुमीवरील 2500 सेंटीमीटर दर्शविते. योजनेनुसार नवा नकाशा 1:500 रिझोल्यूशनचा असणार आहे.