fbpx

भारतीय संघ विजयाच्या दिशेने

टीम महारष्ट्र देशा : माऊंट माऊंगानुई येथे सुरु असलेल्या भारत वि. न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करत न्यूझीलंड समोर 325 धावांचे लक्ष्य उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाची सपशेल पडझड पाहिला मिळाली.

भारतीय संघाच्या आक्रमक गोलंदाजांनी किवीच्या फलंदाजाना लवकरच तंबूचा मार्ग दाखवला. ३४ षटकानंतर न्यूझीलंड संघ ८ बाद १८९ धावा अशा पराभवाच्या छायेत आहे. तर ब्रेसवेल मात्र संघाची एक बाजू धरून आहे. न्यूझीलंड संघाला ९६ चेंडूत १३६ धावांची गरज आहे तर भारतीय संघाला जिंकण्यासाठी केवळ २ विकेटस ची गरज आहे.

आतापर्यंत भारताच्या शमी ,चहल ,केदार जाधव , भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या तर कुलदीप यादव ने ४ विकेट घेतल्या आहेत.