भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात आधिक बळकट होईल जागतिक बँकेचा दावा

टीम महाराष्ट्र देशा : सध्या मोदी सरकारवर सगळीकडून टीकेची झोड उठली आहे. जीएसटी, नोटाबंदी, महगाई या मुद्द्यावरून विरोधक तर रान पेटवतच आहेत पण सरकारला आपल्या अर्थनीती वरून तर स्वतःच्या पक्षातील जेष्ठ नेत्यांच्या विरोधाला सुद्धा सामोर जाव लागत आहे.

अशात मोदी सरकारला एक दिलासा देणारी बातमी थेट वॉशिंग्टन मधून आली आहे. जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात अच्छे दिन येतील, असा दावा जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी केला आहे. जागतिक बँकेच्या या दाव्यामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे.

किम म्हणाले की, “वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)चा भारतीय अर्थव्यवस्थेवर लवकरच सकारात्मक बदल दिसून येईल. जीएसटीसाठी प्राथमिक तयारींमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर पहिल्या तिमाहित घसरला. पण आगामी काळात जीएसटीचा सकारात्मक बदल दिसून येईल.”

You might also like
Comments
Loading...