भारतीय अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’, फ्रान्सला मागे टाकत भारत सहाव्या स्थानी

blank

टीम महाराष्ट्र देशा :  भारताची अर्थव्यवस्था चुकीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं प्रख्यात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी ‘भारत और उसके विरोधाभास’ या त्यांच्याच पुस्तकाच प्रकाशन करताना वक्तव्य केलं होत मात्र हे वक्तव्य फोल ठरलं आहे. कारण वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन आले आहेत. 2017 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 2.59 लाख कोटी डॉलर वर पोहोचली आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था जगातील सहाव्या क्रमांकावर जाऊन पोहोचली.

मात्र, या स्पर्धेत भारत अद्यापही अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटनच्या पिछाडीवरच आहे. सन 2018-19 वर्षासाठी भारताचा जीडीपी 7.3% राहील, असा भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाज नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे विकासाच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्थेने फ्रान्सला मागे टाकत भारतीय अर्थव्यवस्थेन हे एक पाऊल पुढे टाकले आहे. गेल्या वर्षी भारताचा जीडीपी 2.597 ट्रिलियन डॉलर येवढा होता, तर फ्रान्सचा जीडीपी 2.582 ट्रिलियन डॉलर एवढा होता. परंतु, जुलै 2017 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढ झालेली आपणाला पाहायला मिळत आहे.

सध्या भारताची लोकसंख्या 1.34 अब्ज एवढी आहे. भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनत आहे. त्याचबरोबर सातव्या क्रमांकावर घसरण झालेल्या फ्रान्सची लोकसंख्या 6 कोटी 7 लाख एवढी आहे. दरम्यान, गतवर्षी उत्पादन आणि उपभोक्ता खर्चात झालेल्या तेजीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान, यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्था 7.4 टक्के या गतीने तर पुढील वर्षी 7.8 टक्क्यांनी वाढेल असे सांगितले होते. त्याचबरोबर 2018मध्ये चीनची अर्थव्यवस्था 6.6 टक्के व 2019 या वर्षी 6.4 टक्क्यांनी वाढेल असे भाकित केले होते.

2017 साली भारताची अर्थव्यवस्था 6.7 टक्क्यांनी तर चीनची अर्थव्यवस्था 6.8 टक्के अशी रस्सीखेच सुरु होती. त्यापूर्वी भारत हा सर्वात वेगवान अर्थव्यवस्थेचा देश म्हणून ओळखला जात होता. 2016 साली भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रगतीचा वेग 7.1 टक्के इतका होता. मात्र, जीएसटी व निश्चलनीकरणामुळे तो वेग मंदावल्याचे सांगण्यात येतंय.

अर्थव्यवस्था संपूर्ण कॅशलेस होऊ शकत नाही-

पावसाचा मराठवाड्यात ब्रेक, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट