fbpx

जळगावात विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव : श्रद्धा कॉलनीतील रहिवासी भारती पाटील या पंचवीसवर्षीय विवाहिताने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रध्दा कॉलनी येथील योगेश प्रकाश पाटील यांच्या घरात चालक दिपक पाटील हे पत्नी भारती यांच्यासोबत भाड्याने राहतात. मंगळवारी सकाळी घरी कुणी नसतांना भारती पाटील यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. घटना लक्षात येताच त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आलो. वैद्यकीय अधिकार्यांनी भारती पाटील यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी योगेश पाटील यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.