राजाराम मंडळाच्या वेल्लूर येथील गोल्डन टेम्पल सजावटीचे उद्घाटन 

सदाशिव पेठेतील श्रीमंत छत्रपती राजाराम मंडळाचे यंदा १२७ वे वर्ष ; वेल्लूर येथील मंदिराची प्रतिकृती

पुणे : सदाशिव पेठेतील श्रीमंत छत्रपती राजाराम मंडळ यंदा १२७ वे वर्ष साजरे करीत असून त्यानिमित्ताने दक्षिण भारतातील वेल्लूर येथील गोल्डन टेम्पलची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यंदाच्या सजावटीच्या उद््घाटन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते झाले.

यावेळी स्वरदा बापट, नगरसेवक राजेश येनपुरे, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, आशुतोष आगाशे, मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, उपाध्यक्ष अरुण गवळे, संग्राम शिंदे, मंगेश झोरे, सुधाकर जराड, सुनिल निंबाळकर यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

दक्षिण भारतातील वेल्लूरची गोल्डन टेम्पलची प्रतिकृती प्रख्यात कलाकार अमन विधाते यांनी साकारली आहे. मंदिराची प्रतिकृती ७२ फूट लांब, ३४ फूट रुंद आणि ६० फूट उंच आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला कारंजे बसविण्यात आले असून प्रत्यक्ष वेल्लूर येथील मंदिरात आल्याचा भास भाविकांना होत आहे. मंदिरात आकर्षक झुंबर, शेकडो रंगीबेरंगी दिवे बसविण्यात आले असून आकर्षक विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे.

पालकमंत्री गिरीष बापट म्हणाले, यंदाच्या वर्षी आपण हा गणेशोत्सव दारू आणि डॉल्बीमुक्त साजरा करायचा आहे. त्याचे गांभिर्य लक्षात घेवून मंडळांनी पोलिसांना व पालिकेला सहकार्य करावे. या आनंदोत्सवाला कुठेही गालबोट लागू न देता आनंदाने साजरा करू. छत्रपती राजाराम मंडळाच्या देखाव्याची संकल्पना सुरेख आहे. पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात राजाराम मंडळाच्या देखाव्याचे आकर्षण आहे. धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक आशय लक्षात घेवून विविध उफक्रम मंडळातर्फे राबविले जातात.

गणेशोत्सवात स्तनपानगृहाचा उपक्रम कौतुकास्पद – आ. मेधा कुलकर्णी

युवराज निंबाळकर म्हणाले, मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील विविध धार्मिक स्थळांच्या प्रतिकृती साकारण्यात येत आहेत. पुणेकरांना आणि पुण्यात येणा-या गणेशभक्तांना त्या धार्मिक स्थळांचे याची देही याची डोळा दर्शन घेता यावे, याकरीता जशीच्या तशी संपूर्ण प्रतिकृती साकारली जाते, असेही त्यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...