‘महत्वाचं म्हणजे इंदापूरच्या जनतेनं नाकारल्यामुळं आमदारकी नाही, आता निवांतच झोप लागणार’

पुणे : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याबाबत एक वक्तव्य केलं. त्यावरुन हर्षवर्धन पाटलांवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून टीकेची झोड उठवली जात आहे.  ‘भाजपमध्ये मी मस्त, निवांत आहे. शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही, काही नाही…’, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे.

भाजपमध्ये गेल्यामुळे चौकशी नाही हे सांगून हर्षवर्धन पाटील यांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केलेलं आहे. भाजपमुळे चौकशी नाही आणि महत्वाचं म्हणजे इंदापुरच्या जनतेने नाकारल्यामुळे तुम्हाला आमदारकी नाही. त्यामुळे आता निवांतच झोप लागणार, असा खोचक टोला रुपाली चाकणकरांनी लगावला आहे.

आम्हालाही भाजपमध्ये जावं लागलं. तो निर्णय मी का घेतला तेवढं मला विचारू नका. ते काँग्रेसच्या नेत्यांना विचारा, असं ते म्हणाले. ‘पण आता भाजपमध्ये मी निवांत आहे. शांत झोप लागते. चौकशी नाही, फिवकशी नाही, काही नाही, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या