तोंडात जोर असणाऱ्यांनाच राज्यसभेची ऑफर- सूर्यकांता पाटील

भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपला दिला घरचा आहेर

टीम महाराष्ट्र देशा: भाजपने पक्षांतर्गत वादाची सीमा पार केली आहे. पक्षातील अंतर्गत वादामुळे भाजपातील अनेक दिग्गज नेते नाराज आहे. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

सूर्यकांता पाटील यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये होत्या. २०१४ च्या निवडणुकीनंतर मुंबई इथं अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

नेमकं काय म्हणाल्या सूर्यकांता पाटील ?

राजकारणात  फक्त पैशाला महत्त्व आहे. केवळ तोंडात जोर असणाऱ्यांनाच राज्यसभेची ऑफर मिळते. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. यासंदर्भात त्यांना फेसबूकवरही पोस्ट लिहिली आणि नाव न घेता नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

You might also like
Comments
Loading...