‘आषाढी एकादशीच्या सणाचे महत्त्व मोठे’; शरद पवारांच खास ट्विट

sharad pawar

नवी दिल्ली : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. यंदा आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दाम्पत्याने महापूजा केली.

दरम्यान, ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खास ट्विट करत आजच्या दिवसाचे महत्व सांगितले आहे. ‘संत संप्रदायाची शिकवण आणि मानवा-मानवांतील एकात्मतेची वीण घट्ट करणाऱ्या आषाढी एकादशीच्या सणाचे मोठे महत्त्व आहे. महाराष्ट्रात तळागाळापर्यंत झिरपलेल्या भक्तीरसाचा हा सांस्कृतिक वारसा आहे. तो असाच वृद्धिंगत होत राहो या सदिच्छेसह सर्व विठ्ठलभक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा,’ असं ट्विट करत पवारांनी लाखो वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आषाढी एकादशी निमित्त खास मराठीत ट्विट करत वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे,’ असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP