सवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार

prakash jawadekar

पुणे : आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी) असलेल्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. मोदी सरकाराची कामे आणि दिल्लीचे झालेले भाजपचे अधिवेशन याबाबत माहिती देण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले देखील उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की, या संदर्भात केंद्र शासनाने दोन दिवसांपूर्वी अध्यादेश काढला आहे. सर्व राज्य सरकार त्याचे पालन करतील असा मला विश्वास आहे. दरम्यान, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संजय काकडे यांच्यावर निशाणा साधला.

मी कोणत्याही भाकितांवर बोलत नाही. मात्र काकडेंनी दानवे यांच्याबद्दल मांडलेल्या मतावर गोगावले यांनी कालच पत्रक काढलं आहे. पालिकेच्या वेळी जरी त्यांचं भाकीत खरं ठरलं मात्र एकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, म्हणत जावडेकर यांनी काकडेंना टोला लगावला आहे.