मोदी सरकारवर केलेल्या ‘टीकेचा’ परिणाम ; पाठवलं चक्क विमानतळावरून घरी

टीम महाराष्ट्र देशा : नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर जगातील अनेक देशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताच्या आमंत्रणावरून युरोपियन युनियनच्या काही खासदारांनी जम्मू-काश्मीरलाही भेट दिली होती. पण मात्र, सोमवारी ब्रिटनच्या लेबर पार्टीच्या खासदार असणाऱ्या डेबी अब्राहम यांना भारतात येण्यापासून रोखण्याचा निर्णय घेत

दिल्ली विमानतळावरून परत पाठविण्यात आले. यावरून ब्रिटिश खासदारांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे.
डेबी अब्राहम या ब्रिटीश खासदार आणि ऑल पार्टी पार्लियामेंट्री ग्रुप ऑफ काश्मीरच्या अध्यक्षा आहेत. सोमवारी सकाळी ८.५० वाजता डेबी अब्राहम दिल्ली विमानतळावर पोहोचल्या. त्यावेळी त्यांच्या व्हिसा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हा व्हिसा ऑक्टोबर २०२० पर्यंत वैध होता. भारतात प्रवेश रद्द झाल्याप्रकरणी ब्रिटीश खासदार म्हणाल्या, की प्रत्येक व्यक्तीप्रमाणे मी सुद्धा ई-व्हिसासोबत कागदपत्रे दाखवली. मात्र, विमानतळ प्राधिकरणाने नकार दिला. मला सांगण्यात आले की, माझा व्हिसा रद्द झाला आहे आणि माझा पासपोर्ट घेऊन काही काळासाठी निघून गेले.

Loading...

या सगळ्या वादावर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुत्रांनी सांगितले की, ब्रिटीश खारदाराचा ई-व्हिसा आधीच रद्द झाला होता. त्यांना त्याबद्दल कळविण्यात आले होते. ज्यावेळी त्या इंदिरा गांधी विमानतळावर आल्या. त्यावेळी त्यांच्याकडे व्हिसा नव्हता. इतकेच नाही तर ट्विटरवर डेबी अब्राहम ट्विटरवर सुद्धा आपली तक्रार पोस्ट केली आहे.पण एकंदर्तीतच मोदी सरकारवर केलेल्या टीकेमुळे हे सगळे कारस्थान असल्याचे बोलले जात आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती