fbpx

देशी दारूचा अवैध साठां जप्त

balapur police

बाळापुर (अकोला ) : गुप्त माहीतीनुसार सापळा रचून दीड लाख रुपयाची अवैद्य देशी दारु व चारचाकी वाहन बाळापूर पोलिसांनी जप्त केले.ही कारवाई आज रविवार सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळापुर तालुक्यातील गायगांव येथून पारस मार्गे बाळापूर शहरात देशीदारुच्या पेट्या घेऊन एक टाटा नॅनो येत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी पारस गाव गाठून फिल्डिंग लावली.पारस रेल्वे गेटच्या दिशेने येणारी एक टाटा नॅनो गाडी पोलिसांना दिसली. सदर गाडी पोलिसांनी पारस येथे थांबवुन तपासणी केली. तपासणी दरम्यान देशी दारूच्या दहा पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी गाडीसह देशी दारूच्या चारशे ऐंशी अवैध बाटल्या जप्त केल्या. देशी दारूची किंमत तीस हजार व गाडी असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी अनिल शिवराम नाईक (रा. बाळापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधीकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनात बाळापूर ठाणेदार एफ सी मिर्झा, पोलीस हे.कॉ. मिश्रा, सहा.पो.उपनिरीक्षक शिरसाट, दुबे, ठाकरे यांनी केली.