‘भिंत बांधावी ही कल्पना, आग्रह नाही’; विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री ठाकरेंच स्पष्टीकरण

uddhav thackeray

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन वेळा कोल्हापूर दौरा पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर आज(दि. ३० जुलै) रोजी ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शिरोळ तालुक्यातील पुरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूर शहरातील शाहूपुरी भागातील पाहणी केली. यानंतर सर्व अधिकारी, आमदार, खासदार, जिल्ह्यातील मंत्री यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, समुद्रकिनारी असणाऱ्या गावांच्या भागांच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेण्याबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये चर्चा सुरु आहे. समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरून घटना घडू नये किंवा शेत जमिनी समुद्राच्या पाण्याने खराब होऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधणार आहे. पाच जिल्ह्याच्या अनेक भागात जवळपास 171 किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यात ही संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.

यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडलं होतं. मुख्यमंत्री ठाकरेंनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी भिंत बांधायची कल्पना मांडली होती. पण त्यावर मतमतांतरे असेल तर आपण पुढे सरकता येणार नाही. केवळ भिंत हा पर्याय असू शकतो का असं मी म्हटलं होतं. असेल तर पुढे जाऊ, नसेल तर सोडून देऊ. भिंत बांधावीच हा माझा आग्रह नाही,’ असं भाष्य मुख्यमंत्री ठाकरेंनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या