VIDEO : व्यायाम शाळेसाठी मिळालेले क्रीडा साहित्य सोसायटीच्या गोडाऊन !

अहमदनगर : गदेवाडी येथील व्यायाम शाळेसाठी मिळालेले क्रीडा साहित्य व्यायाम शाळेत न ठेवता दांडेलशाहीने सोसायटीच्या गोडाऊन मध्ये बेकायदेशीर ठेवण्याच्या निषेधार्थ भारतीय टायगर फोर्स गदेवाडी शाखेच्या वतीने शेवगाव तहसील कार्यालयासमोर अमोरण उपोषण करण्यात आले होते.

ग्रामसेवक यांनी व्यायाम शाळेचे साहित्य नियमानुसार व्यायाम शाळेत ठेवण्याचे लेखी आश्वासन दिले होते त्यामुळे मागील आंदोलन स्थगित करण्यात आले होते, परंतु आजपर्यंत व्यायाम शाळेचे साहित्य व्यायाम शाळेत ठेवण्याचे कोणतेही कार्यवाही झालेली नाही सदरची व्यायाम शाळा खाजगी गोडाऊन मध्ये चालू करण्यात आले आहे त्यामुळे दि 23 जानेवारी पासून तहसील कार्यासमोर अमोरण उपोषण सुरू होते.यावेळी उपोषणात सुरेश धनवडे, रमेश धनवडे,भारत वंजारी ,मुकेश मानकर,सोमनाथ धनवडे, नितीन कुसळकर ,सतीश धनवडे, मच्छिद्र धनवडे, विजय गजले, अनिल गजले, यांच्या सह युवक उपस्थित होते.

तहसलीदार पाटील साहेब व पोलीस निरीक्षक यांच्या मध्यस्तीने व प्रवीण विटकर , किसन चव्हाण यांनी तहसीलदार यांच्या सोबत चर्चा करून उपोषण सोडण्यात आले.

पहा काय आहे गावकऱ्यांची व्यथा