लाज वाटू द्या : कोरोनाग्रस्तांवर उपचार होणाऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सला सोसायटीत येण्यास मज्जाव

corona kit

औरंगाबाद : कोरोना ने राज्यात हैदोस घालून तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. क्वारंटाईन केलेले पेशंट आता घरी परतू लागले आहेत. पण समस्या तिथेच आहे, या पेशंटला त्या-त्या वसाहतीत किंवा कॉलनीत पूर्वीप्रमाणे स्विकारले जात नाही. त्यामुळे आता गरज आहे ती व्यापक प्रबोधनाची.

हा अनुभव फक्त पेशंट पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या नर्स, वॉर्डबॉय, टेक्निशियन आणि डॉक्टर यांनाही येत आहे. मुळात याचे कारण स्पर्शाने किंवा संपर्काने या विषाणूची लागण होते, ही जरी वस्तुस्थिती असली तरी योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास विषाणु ची बाधा होत नाही. हे सांगण्याची गरज आहे. कारण गेल्या चार आठवड्यात राज्यातील ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तिथे अशा प्रकारची ची काळजी त्यांच्यावर इलाज करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, टेक्निशियन आणि सफाई कामगार घेत आहेत म्हणून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना या विषाणूची बाधा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

ज्या रुग्णांवर इलाज झाला आहे, त्यांना पुढचे काही दिवस काळजी घ्यावी लागते. त्यांनी जर त्याकाळात घरातच स्वतःला विलगीकरण करून ठेवले तर त्याची बाधा इतरांना होण्याचा संभव कमी असतो. पण औरंगाबाद मध्ये घाटीत काम करणाऱ्या दोन नर्सला त्यांच्या वसाहतीमध्ये आणि अपार्टमेंट मध्ये येण्यास नागरिकांनी मज्जाव केला. यासाठी तीन ते साडेतीन तास संघर्ष आणि आणि वाद विवाद सुरू होता. पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. अशा परिस्थितीमध्ये शासनाने लोकांचे विलगीकरणातून परत आलेल्या या संदर्भाने आणि आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने प्रबोधन करणे गरजेचे आहे. नाहीतर परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे.