सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत हॉस्पिटलने दिले मोठे अपडेट्स

गांगुली

मुंबई : .भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. गांगुली यांना बुधवारी (२७ जानेवारी) पुन्हा हृदयाशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉस्पिटलने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, गांगुली यांची रुग्णालयाच्या अनेक चाचण्या झाल्या व त्याची प्रकृती स्थिर आहे.

ओपोलो हॉस्पिटलने निवेदनात सांगितले होते की, ‘४८ वर्षीय गांगुली हृदयाची तपासणी करुन घेण्यासाठी आला होता. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या पॅरामीटर्समध्ये (तापमान, नाडी, श्वसन दर आणि रक्तदाब) कोणताही बदल झालेला नाही.’

गांगुलीवर गुरुवारी (२८ जानेवारी) एंजिओग्राफी होण्याची शक्यता आहे. डॉक्टर देवी शेट्टी यांच्या निदर्शनाखाली डॉक्टर अत्लाफ खान गांगुलीच्या हृदयाच्या धमनीमध्ये स्टेंट टाकणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

याआधी ३ जानेवारीला सकाळी जिममध्ये व्यायाम करताना गांगुलीने छातीत दुखू लागल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्याला लगेचच कोलकातामधील वुडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी पण करण्यात आली होती. त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यात ३ ब्लॉकेजेस असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेंट टाकण्यात आला होता. त्यानंतर ५ दिवसांनी त्याला घरी देखील सोडले होते.

बुधवारी त्याने जेव्हा त्रास होत असल्याची पुन्हा तक्रार केली होती, तेव्हा त्याच्यासाठी कोलकाता पोलिसांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यासाठी ग्रीन कॉरिडोर बनवला होता.

महत्वाच्या बातम्या