INDvSL- रोहित शर्मा :The legend

The hitman strikes against Sri Lanka! A historic third ODI double ton from @ImRo45, who makes 208*, leads India to a massive 392/4 in Mohali #INDvSL

मोहाली – स्वप्निल कडू  :आधुनिक क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेल्या रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेट मधील अविस्मरणीय खेळी आज साकारली.एकदिवसीय क्रिकेटमध्ये फिफ्टी मारण्यात धन्यता मारणारे कुठे आणि 3 द्विशतक झळकवणारा रोहित शर्मा तुलनाच करणे कठिण. आधुनिक क्रिकेट मधील एक उत्कृष्ट खेळी आज रोहित शर्माच्या खेळीदरम्यान बघायला मिळाली. षटकारांची आतिषबाजी करत 12 षटकार व 13 चौकार रोहितने लगावले.भारताने 50 ओव्हरमध्ये 392 धावा कुटल्या. भारतातर्फे धवनने 67 तर श्रेयस अय्यरने 87 धावा फटकवल्या.The hitman strikes against Sri Lanka! A historic third ODI double ton from @ImRo45, who makes 208*, leads India to a massive 392/4 in Mohali #INDvSL

2015 पासून रोहितची बॅट तळपत असून केवळ 47 इंनिंगमध्ये रोहितने 11 शतके झळकावले आहेत.केवळ डेविड वॉर्नर रोहित शर्माच्या पुढे असून त्याने 12 शतके या काळात 57 डावात झळकावले आहेत. रोहित शर्मा आपल्या कारकिर्दीतील सोनेरी काळ अनुभवत असून अनेक विक्रमाना गवसणी घालत आहे.जगातील आजच्या घडीला रोहित सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.The hitman strikes against Sri Lanka! A historic third ODI double ton from @ImRo45, who makes 208*, leads India to a massive 392/4 in Mohali #INDvSL

ज्याचा खेळ बघताना मजा वाटते त्यापैकी रोहित शर्मा नक्कीच एक .रोहितने एकदिवसीय क्रिकेट मध्ये आजपर्यंत 16 शतके लगावली आहेत.रोहितचा खेळ असाच बहरत राहिल्यास तो अनेक नवीन विक्रम प्रस्थापित करेल यात शंकाच नाही.The hitman strikes against Sri Lanka! A historic third ODI double ton from @ImRo45, who makes 208*, leads India to a massive 392/4 in Mohali #INDvSL

रोहित शर्माने एक चांगला कर्णधार म्हणूनही IPL मध्ये स्वतः ला तीनदा विजेतेपद पटकावून सिद्ध केले आहे.जे विराट व धोनी लाही जमले नाही ते रोहित शर्माने करून दाखवले आहे.विराट कोहलीचा workload कमी करण्यासाठी कर्णधार म्हणून एकदिवसीय व 20-20मध्ये रोहित सक्षम पर्याय ठरू शकतो.

वनडेत द्विशतक करणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार

वनडेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
२१९ वीरेंद्र सेहवाग विरुद्ध विंडीज
२०८* रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका
१८९ सनाथ जयसूर्या विरुद्ध भारत
१८६* सचिन तेंडुलकर विरुद्ध न्यूझीलँड