राणी पद्मावतीचा इतिहास आता पाठ्यपुस्तकात

पद्मावतीवर शाळेत धडा शिकवला जाईल. राणी पद्मावतीच्या बलिदानाची गाथा विद्यार्थी वाचतील. यासाठी त्यांना चुकीच्या माध्यमांवर अवलंबून रहावं लागणार नाही

टीम महाराष्ट्र देशा – मध्यप्रदेशातील शाळांमध्ये आता राणी ‘पद्मावती’च्या बलिदानाची कहाणी शिकवली जाणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उज्जैनमध्ये एका कार्यक्रमात याबाबत घोषणा केली.’पुढच्या शैक्षणिक वर्षापासून महाराणी पद्मावतीवर शाळेत धडा शिकवला जाईल.

राणी पद्मावतीच्या बलिदानाची गाथा विद्यार्थी वाचतील. यासाठी त्यांना चुकीच्या माध्यमांवर अवलंबून रहावं लागणार नाही, तसंच त्यामुळे येत्या पिढीला खरा इतिहास समजण्यास मदत होईल , असं चौहान म्हणाले.यापूर्वी सोमवारी भोपाळमध्ये मुख्यमंत्री चौहान यांनी पद्मावती सिनेमावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. संजय लिला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटावर मोठा वाद उफाळून आला आहे.

You might also like
Comments
Loading...