मराठ्यांचा इतिहास झळकणार मोठ्या पडद्यावर

आशुतोष गोवारीकर बनवणार पानिपतमधील मराठ्यांच्या अजरामर लढाईवर चित्रपट

मुंबई: वीर मराठ्यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘पानिपत’ या नवीन चित्रपटाच पोस्टर रिलीज झालं असून दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर मराठ्यांच्या अजरामर लढाईवर सिनेमा बनवणार आहेत.

पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता जवळपास अडीचशे वर्ष उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘पानिपत’ चं पोस्टर रिलीज झाले आहे. आशुतोष गोवारीकर आता पानिपतमधील मराठ्यांच्या अजरामर लढाईवर सिनेमा बनवणार आहेत. गोवारीकर यांचा ‘मोहेंजोदरो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. पण ते पुन्हा एकदा पीरियड फिल्मवर हात आजमावणार आहेत.

panipat movie

संजय दत्त, अर्जुन कपूर आणि कृती सेनन हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अर्जुन कपूर आणि संजय दत्त एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिनेमात अर्जुन मराठा योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर संजय दत्तचीही महत्त्वाची भूमिका आहे. तसेच हा चित्रपट पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित असणार आहे. मराठांच्या इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून ६ डिसेंबर २०१९ रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

sanjay dutt First Look of panipat
File Photo

‘पानिपत-द ग्रेट बेट्रेयल’ या नव्या चित्रपटाची अधिकृत घोषणा गोवारीकर यांनी केली असून त्याचा फर्स्ट लूकही जारी केला आहे. पोस्टर शेअर करताना आशुतोष गोवारीकर म्हणतात "इतिहासाच्या कथा कायमच मला आकर्षित कतात. यावेळी ही कहाणी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाबाबत आहे. हे पाहा पहिलं पोस्टर.

You might also like
Comments
Loading...