गेल्या वर्षी जम्मू काश्‍मीरमध्ये घडल्या सर्वाधिक ‘सीझफायरच्या’ घटना 

पुणे – वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना योग्य तो धडा शिकवू’, अशी गर्जना करत सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याच घोषणेचा विसर पडल्याचे दिसत आहे. गेल्या दहा वर्षांमधील
जम्मू- काश्‍मीर येथील सीमारेषेवर सर्वाधिक ‘सीझफायर’ 2017 मध्ये झाले . विशेष म्हणजे 2016 साली झालेल्या सर्जिकल स्ट्राइक नंतरच सीझफायर’चे प्रमाण वाढले असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारांतर्गत समोर आलीये.

गेल्या काही वर्षांमध्ये सीमारेषांवर शत्रु सैन्याकडून सातत्याने होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन ही चिंतेची बाब बनली आहे. विशेषत: पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते. यामुळे शेकडो सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानकडून आतापर्यंत नेमके कितीवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले, याबाबत पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी माहिती मागविली होती.

Rohan Deshmukh

त्याला संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या उत्तरामध्ये गेल्या दहा वर्षात सर्वात जास्त "सीझफायर’च्या घटना या 2017 साली घडल्या तर सर्वात कमी 2009 साली घडल्या असल्याचं नमूद करण्यात आलं. तर 2018 सालात एप्रिलपर्यंत 666 घटनांची नोंद विभागाकडे करण्यात आली आहे.

अशाच एका हल्ल्यात भारतीय जवनांचे शिर कापून नेल्याच्या घटनेने देशाला हादरवून सोडले होते. या घटनेनंतर भारतीय सैन्य आणखी किती काळ शांत राहणार? असा प्रश्न  देशभरातून उपस्थित करण्यात आला होता. वारंवार होणाऱ्या या उल्लंघनाला योग्य तो प्रतिउत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असे जाहीर वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या प्रचारसभेत केले होते. मात्र अद्यापही या मोहिमेला पुरेसं यश मिळालं नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...