उस्मानाबादेत कोरोना रुग्णांचा उच्चांक; एका दिवसात आढळले ४८९ रुग्ण

उस्मानाबाद : कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या पाहता चिंतेचे वातावरण पसरले आहे. लसीकरणाची मोहीम सुरु असतानाच कोरोना चाचण्या सुद्धा मोठ्या संख्येने होत आहेत. कोरोना बाधितांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून घेण्यात येत आहे. वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सध्या सरकार तसेच स्थानिक प्रशासन करत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली असून रूग्णसंख्येचा रोज नवा उच्चांक होत आहे. गुरुवारी जिल्ह्यात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले. गुरुवारी जिल्ह्यात ४८९ रुग्ण आढळले असून त्यात तिघांचा मृत्यू झाला. वाढत्या रूग्णसंख्येने परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. सध्या जिल्ह्यात ३२९९ रुग्ण उपचाराखाली आहेत.

शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांचे प्रमाण अत्यंत वेगाने वाढत आहे. गुरूवारी आढळलेल्या ४८९ पैकी २५१ रूग्ण उस्मानाबाद तालुक्यात आढळले आहेत. यामध्ये शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील एकूण कोरेाना रुग्णांची संख्या २३५०२ झाली असून, त्यापैकी १९५८४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ६२० जण आतापर्यंत कोरोनाने दगावले आहेत. सध्या ३२९९ जणांवर उपचार सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या