कोव्हिड नियमांच उल्लंघन करणाऱ्या प्रचारसभांवरून उच्च न्यायालयाने फटकारले

दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली: देशात सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू ,केरळ आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. या निवडणुकीत बंगाल ची निवडणूक प्रतिष्ठेची लढत बनली आहे. येथे मोदी विरूद्ध ममता असाच प्रचार निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून सुरू आहे.

दरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असून करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. यामध्ये निवडणूक प्रचारामध्ये होत असलेल्या कोरोना नियमांचे उल्लंघन हा मोठा गंभीर प्रश्न बनला आहे.

या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालय चांगलेच संतापले असून मास्क न लावणाऱया सामान्य नागरिकांकडून मोठा दंड वसूल करताय, मग प्रचारासाठी विनामास्क फिरणाऱया नेत्यांना सूट का? हा दुजाभाव कशासाठी? असा सवाल न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला केला आहे.

या संदर्भात उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विक्रम सिंह यांनी याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि जसमीत सिंग यांच्या खंडपीठाने दखल घेत न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून याप्रकरणी 30 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या