सुशांतच्या वडिलांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

सुशांत

नवी दिल्ली : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी बऱ्याच बॉलीवूड कलाकारांची नावे समोर आली. या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नाव समोर आलं होतं. त्यांनतर रिया चक्रवर्तीला काही दिवस कोठडी देखील सुनावली होती. मात्र यानंतर सुशांत सिंह राजपूतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी याचिका एक याचिका दाखल केली होती. ती याचिका  दिल्‍ली हायकोर्टानं फेटाळली आहे.

सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी या याचिकेत सुशांतच्या जीवनावर आधारित विविध चित्रपटांवर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. पण न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे.

यामुळे दिल्ली हायकोर्टानं ‘न्याय : द जस्टीस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरही स्थगिती लावण्यास नकार दिला आहे. हा चित्रपट दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर आधारित असल्याची चर्चा आहे. याच शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तसंच ‘न्याय: द जस्टिस’, ‘सुसाइड ऑर मर्डर : अ स्टार वॉज लॉस्ट’, ‘शशांक’ आणि आणखी एका चित्रपटाचाही त्यांनी उल्लेख केला होता. हे सर्व चित्रपट सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर आधारित आहेत.

सुशांतच्या आत्महत्येला लवकरच एक वर्ष पूर्ण होतं असून, याबाबत अजूनही काय ठोस पुरावे समोर आले नाही. त्याचे कुटुंब देखील त्याला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सुशांत सिह राजपूतने वांद्रे इथल्या त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IMP