मुंबई:हायकोर्टाने OBC आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे.
दरम्यान हायकोर्टाच्या या निर्णयामुळे OBC आरक्षणाशिवाय यंदाच्या निवडणुका होतील. राज्यात साधारण १४ महापालिका आणि २५ जिल्हापरिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असून त्या २०२० च्या प्रभागरचनेनुसार घेण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.
दरम्यान निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यावरही हायकोर्टाने नाराजी जाहीर केली आहे. दरम्यान आता या सर्व निर्णयानंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया उमटतील, याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत. ठाकरे सरकारला भाजप पुन्हा एकदा OBC आरक्षणावरून घेरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “मुस्लिमांनी धार्मिक वळण दिल्यास, आम्हीही धार्मिक वळण देऊ” ; राज ठाकरे
- “राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या व्हिडिओचा दाखला देत नव्याने राजकारण तापविले”, छगन भुजबळांचा आरोप
- IPL 2022 CSK vs RCB : एक मॅच विक्रमांची..! धोनीला आज एक-दोन नव्हे, तर ‘इतके’ विक्रम करण्याची सुवर्णसंधी; वाचा!
- प्रसिद्ध असलेली भेंडवळची भविष्यवाणी जाहीर!
- रोहितच्या टीम इंडियाचा ‘मोठा’ पराक्रम; आयपीएलदरम्यान ICCनं दिली खुशखबर!