#ब्रेकिंग – खर्चाच्या भीतीने शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची घटवली

खर्च कमी करण्यासाठी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा आणि तलवारीची उंची वाढवण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने महाराजांच्या पुतळ्याची उंची ७.५ मीटरने कमी करण्याचा निर्णय घेतलाय. पण तलवारीची उंची प्रस्तावित आराखड्यापेक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरुन एकूण उंची कमी होणार नाही. पुतळ्याची उंची ८३.२ वरून ७५.७ मीटर करण्यात येणार तर तलवारीची उंची ३८ मीटर ऐवजी ४५.५ मीटर करण्यात येणार.

  • अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील छत्रपतींच्या पुतळ्याचा प्रस्तावित एकूण उंची १२१.२ मीटर होती.
  • यात घोड्यासह छत्रपतींच्या पुतळ्याची उंची ८३.२ मीटर आणि तलवारीची उंची 38 मीटर होती.
  • 88.8 मीटर उंचीचे स्मारक मिळून एकूण उंची २१० मीटर होती.
  • स्मारकाचा खर्च कमी करण्यासाठी सरकारने आता पुतळ्याची उंची कमी करून तलवारीची उंची वाढवण्याचे प्रस्तावित केले आहे
  • नव्या बदलानुसार पुतळ्याची उंची ८३.२ वरून कमी करून ७५.७ मीटर, तर तलवारीची उंची ३८ मीटरवरून वाढवून ४५.५ मीटर करण्यात आली आहे.
  • या बदलामुळे स्मारकाच्या खर्चात ३३९ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी होता कामा नये- अजित पवार