Sanjay Raut | मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांचा ईडी मधील मुक्काम संपला असून काही दिवसांपुर्वीच ते न्यायालयीन कोठडीत गेले आहेत. त्यांच्या जामीनसाठी त्यांनी अर्ज देखील आहे. मात्र, त्यांच्या सुनावणीची तारीख वारंवार पुढे ढकली जात आहे. अशातच पुन्हा त्यांच्या सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
ईडीकडून संजय राऊतांचा युक्तीवाद होणार असून येत्या 21 ऑक्टोंबरला संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे 18 तारखेला सुनावणी झाली तर संजय राऊत यांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 1034 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी शिवसेना खासदार संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. अनेक वेळा त्यांच्या कोठडीमध्ये वाढ झाली आहे. अशातच संजय राऊत यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज केला होता त्यावर सुनावणीसाठी अनेक तारखा आल्या होता.
ईडी युक्तीवाद मांडणार असून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज रद्द करावा, अशी मागणी ईडीने केली आहे. संजय राऊत यांचा मोहरा प्रविण राऊत होता. प्रवीण राऊत गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. सोडून आणखीन कंपन्यांचाही कारभार पाहायचा. त्याने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यावर ३.२७ कोटी रुपये वळवले होते. आमच्यासमोर आणखी काही नोंदी येत असून, तपास सुरू आहे, असा युक्तिवाद ईडीतर्फे अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग यांनी विशेष न्यायालया केला.
प्रवीण राऊत कंपनीच्या कामात सक्रिय होते आणि संजय राऊतही त्यांना मदत करत होते. पत्राचाळीच्या पुनर्विकासात संजय राऊत यांचा सक्रिय सहभाग होता. ईडीने नोंदविलेल्या जबाबांवरून असे समोर आले आहे की, संजय राऊत यांना सदनिका खरेदी करण्यामध्ये स्वारस्य होते. काही लोकांनी एकत्रितपणे १३ लाख रुपये वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात जमा केले. कारण त्यांना संजय राऊतांना नाखूश करायचे नव्हते, असा युक्तिवाद सिंग यांनी न्यायालयात मांडला आहे.
दरम्यान, न्यायालयीन कोठडीत जाण्यापुर्वी शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आईला एक पत्र लिहिलं आहे. डोळ्यात पाणी आणण्यासारखे बोल या पत्रात लिहिण्यात आले होतं. संजय राऊत यांच्या भावनिक पत्राची जोरदार चर्चा रंगली असतानाच मनसे नेत्या स्नेहल सुधीर पारकर यांनी घंट्याचं भावनीक पत्र म्हणत टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | “नव्याचे नऊ दिवस असतात पण…” ; अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर संतापले
- Ambadas Danve | …तर सर्व मंत्र्यांना सरकारी दवाखान्यात घेऊन जायचं का? – अंबादास दानवे
- Ashok Chavan – उद्धव ठाकरे आणि शरद पवार भारत जोडो यात्रेत येणार – अशोक चव्हाण
- ShivSena | विधवा महिलेच्या विरोधात निवडून आला होता शिवसेनेचा पहिला आमदार, आता संस्कृतीच्या गप्पा का?
- Ajit Pawar | पुण्यात पावसाचं थैमान, लोकांची तारांबळ अन् अजित पवार संतापले, म्हणाले…