fbpx

हरयाणा सरकार करणार पानिपत युद्ध स्मारकासाठी सर्वतोपरी मदत

टीम महाराष्ट्र देशा- पानिपतच्या तिसऱ्या युध्दात महाराष्ट्रातील सैनिकांनी प्राणाची बाजी लावून देशाचे संरक्षण केले. या युद्धात पराभव पत्करावा लागला तरी मराठा सैन्याची शूरगाथा हरियाणा व देशातील जनतेसाठी मोलाची आहे. हरियाणा सरकारने मराठा सैन्याचा हाच गौरवशाली इतिहास लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी पानिपत युद्ध स्मारकाचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून पानिपत येथील कालाआम परिसरात स्थित 8 एकरावरील जमिनी सोबतच आणखी 12 एकर जमीन खरेदी करुन एकूण 20 एकरावर युद्ध स्मारक विकासाचे काम सुरु करण्यात येणार आहे.

पानिपत येथील जीटी-कर्नाल राष्ट्रीय महामार्गाशेजारी 4 एकरावर ‘लाईट ॲन्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून पानिपत युद्धाचा गौरवशाली इतिहास दर्शविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पानिपत युद्ध स्मारक विकासासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या 3 कोटींच्या निधीबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना भेट द्या- जयकुमार रावल

महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, राज्याचा पर्यटन विभाग पैठणी साडी, वारली पेंटिंग आदींची ओळख जगाला करुन देण्याचा प्रयत्न करीत आहे. सुरजकुंड मेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ले, गुंफा व अन्य पर्यटन स्थळ प्रदर्शित करण्यात आले आहेत. राज्याच्या हस्तकलाकारांनाही या मेळ्याच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याला लाभलेला 750कि.मी. चा समुद्र किनारा, घनदाट जंगल, अजिंठा वेरुळ सारख्या जगप्रसिद्ध लेण्या, 350 गड-किल्ले आदी पर्यटनाची सामर्थ्य स्थळे आहेत. देश विदेशातील पर्यटकांनी महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळांना भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी हरियाणाचे पर्यटनमंत्री रामबिलास शर्मा, भारतातील थायलंडचे राजदूत चुटिन्ट्रोन गोंगस्कडी, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव तथा सुरजकुंड प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेंद्र त्रिपाठी, हरियाणा पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा सुरजकुंड मेला प्राधिकरणाचे उपाध्यक्ष विजय वर्धन,महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी उपस्थितांना संबोधित केले.

हरियाणाच्या ‘लूर’ या प्रसिद्ध लोकनृत्याचे सादरीकरण यावेळी झाले. थायलंडच्या कलाकारांनी झायलोफोन वादनाचे सादरीकरण केले तसेच सुरीन प्रोव्हिन्सच्या कलाकारांनी ‘कृतदा हिनिहीन’ लोकनृत्य सादर केले. महाराष्ट्राच्या कलाकारांनी ‘लावणी’ हे प्रसिद्ध लोकनृत्य सादर केले.

1 Comment

Click here to post a comment