प्रशासन आणि डॉक्टरांची मेहनत फळाला आली, तुळजापूर तालुका झाला कोरोनामुक्त

blank

तुळजापूर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र तुळजापूर तालुक्यातून आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.येथील उपजिल्हारुग्णालयातील कोरोना विभागात कोरोनाचा उपचार घेत असलेल्या नऊ पैकी नऊ रुग्ण बरे होवुन घरी परतले असल्याने तुळजापूर तालुका ख-या अर्थाने कोरोना मुक्त बनला आहे.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला झाला कोरोना

येथील उपजिल्हारुग्णालयतील कोरोना विभागात नऊ कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेत होते त्यापैकी पुणे रिर्टन ऐकवीस वर्षीय गर्भवती महिला प्रथम कोरोना मुक्त होवुन घरी परतली. त्यानंतर आज लोहारा तालुक्यतील पाच कोरोना पाँजिटीव्ह रुग्ण बरे झाले. तर शुक्रवारी नवी मुंबई रिर्टन तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने शुक्रवार दि 5रोजीत्यांना डिसचार्ज देण्यात आला.

कमाईमध्ये घसरण होऊन देखील अक्षयने पटकावले जगातील श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीमध्ये नाव

दरम्यान,या कोरोना मुक्त रुग्णांना पुढील सात दिवस घरीच क्वारटांईन राहण्याचा सुचना दिल्या आहेत. या कोरोना बाधीत रुग्णांना निरोप देताना उपजिल्हारुग्णालय च्या वैद्यकीय अधिकारी डाँ चंचला बोडके कोरोना रुग्णालयाचे प्रमुख डाँ प्रविण रोचकरी डाँ जाधव झाडे सिस्टर भोसले सिस्टर शितल सह कर्मचारी उपस्थितीत होते.