fbpx

हज यात्रेला सुरूवात, परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

mj-akbar

मक्का : परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी मक्क्या जवळ मीना शहरात जाऊन हजसाठी रवाना होणा-या भारतीयांची भेट घेतली. मीनामधील १ लाख ७० हजार भारतीय यात्रेकरूंनी आज अराफात पर्वताकडे रवाना झाले.

अकबर यांच्याकडे सरकारच्या हज सद्भावना प्रतिनिधिमंडळाचे प्रमुख असून त्यांच्यासह सौदी अरेबियाचे भारतीय दूत अहमद जावेद व वाणिज्य दूत महोम्मद नूर रहमान शेखही यावेळी त्यांच्याबरोबर उपस्थित होते.

जगातील एकूण २० लाखांहून अधिक मुस्लिम नागरिकांनी बुधवारी हज यात्रेला सुरूवात केली. यावर्षी इराणच्या जायरीन-ए-हज यावर्षी ही यात्रा करणार आहे. २०१५ साली चेंगराचेंगरी होऊन काही जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्यावर्षी इराणमधून जायरीन-ए-हज पाठवण्यात आले नव्हते.