एमआयटीच्या गुरुकुल शाळेने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी जाचक बनवलेल्या अटी केल्या रद्द

पुणे- एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल या शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी जाचक अटी घालून दिल्या होत्या शाळेतील विद्यार्थिनींनी पांढऱ्या व स्कीन रंगाची अंतवस्त्रे घालावी, स्कर्टची लांबी एवढीच हवी, पालकांनी एकमेकांशी बोलू नये, विद्यार्थ्यांनी केस एकदम लहान ठेवावे, पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलन करू नये अशा प्रकारचे नियम घालून देण्यात आले आहेत. मुलींचे अंतर्वस्त्र हे पांढरे किंवा क्रीम रंगाचे असावे नियम आखून देणारी पुण्यातल्या माईर्स एमआयटी शाळा अखेर झुकली आहे.

आज पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला फैलावर घेतले. असे जाचक नियम करण्याचा शाळेला अधिकार नसल्याचे बजावल्यानंतर या अटी बिनशर्थ मागे घेत शाळा प्रशासनाने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
शाळेच्या डायरीमध्ये नमूद केलेले नियम-
– मुलींचे अंतर्वस्त्र हे पांढरे किंवा क्रीम रंगाचे असावे. दुसरा कुठलाही रंग स्वीकारार्ह नाही.
– लिपस्टिक, लीप ग्लॉस किंवा अन्य कुठलीही कॉस्मेटिक्स लावायचे नाहीत.
– कानातले सोडून कोणतेच दागिने घालायचे नाही. 0.3 cm च्या आकारापेक्षा मोठे कानातले घालायचे नाही. त्यांचा रंगही काळा, सोनेरी किंवा चंदेरी असावा.
– सायकलच्या पार्किंगसाठी वार्षिक 1500 फी. हेल्मेट सक्तीचं आहे
– शाळेच्या परवानगीशिवाय विद्यार्थी आणि पालक शाळेत किंवा शाळेच्या कॅम्पसच्या बाहेर कुठल्याही सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं नाही