दिंडी मार्गाच्या कामासाठी मुरूम चोरी प्रकरणात पालकमंत्र्यांची गुत्तेदाराला साथ ?

परतूर / प्रतिनिधी : परतूर मतदार संघातून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडी मार्गाच्या कामात संबंधीत गुत्तेदार परतूर परिसरातून कुठलीही परवानगी न घेता बेसुमार मुरूम चोरी करत असून याबाबत गुत्तेदाराला सहकार्य करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री बबनराव लोणीकर हे मुरूमचोरी करणाऱ्या गुत्तेदाराविरोधात मोहीम हातालणाऱ्या अधिकाऱ्यावर सत्तेचा गैरफायदा घेत दबावयंत्र आणत असल्याचा आरोप म.न.से.चे. जालनाजिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी आज पत्रकार परिषद बोलावत केला .

आज दिनांक ८ आॅॅगस्ट २०१८ रोजी परतूर येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री यांच्यावर सोळंके यांनी अनेक आरोप केले. राज्य मार्ग क्रमांक ४५८ शेगाव – पंढरपूर या मार्गाला दिंडी मार्ग असे मनानेच नाव देत राज्य शासण या मार्गाला भावनिक स्वरूप देत असल्याचे ते म्हणाले . या नावाचा शासन दप्तरी कुठलाच उल्लेख नसताना केवळ या कामात शेतकऱ्यांनी व जनतेने विरोध करू नये यासाठी शासनाने ही शक्कल लढवली असल्याचा यावेळी त्यांनी आरोप केला .

या नावाला आपला विरोध नाही मात्र या नावाने तयार होत असलेल्या रस्त्याच्या कामात होत असलेला करोडो रुपयाचा गुत्तेदार, अधिकारी व सत्ताधारी यांच्या संगमताने सर्रासपणे चालू आहे. ही शरमेची बाब असल्याचे ते यावेळी म्हणाले. या मार्गाच्या कामात अनेक ठिकाणी भ्रष्टाचार चालू असून कुठे मुरुमाच्या ऐवजी चक्क काळी माती टाकली जात आहे. तर कुठे या कामात पैसे वाचावे म्हणून गुत्तेदार दररोज लाखो रुपयांंचा मुरूम चोरत असल्याचा त्यांनी आरोप केला .

याबाबत कर्तव्य बजावत परतूर तहसीलदाराने मुरुमचोरावर कारवाई करत पाटोदा परिसरातील सरकारी जमिनीतून मुरूम चोरणाऱ्या अनेक वाहनावर कारवाई केली. व पंचनामा करत ती वाहने जप्त केली मात्र दुसऱ्या दिवशी ती वाहने चोरी गेला असल्याची तक्रार मंडळ अधिकाऱ्याने केली . आज त्याच वाहनाने पुन्हा सर्रासपणे त्याच ठिकाणावरून चोरल्या जात आहे. व सरकारी यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. दुसरीकडे पालकमंत्री लोणीकर आपल्या भाषणात मंत्री मंडळात असा ठराव घेतला की महामार्गाच्या कामात सरकारी रेती, मुरूम कसलीही रक्कम न घेता गुत्तेदाराला नेता येतो. या बाबत तहसीलदार यांना माहिती नाही . पालकमंत्री याचे सार्वजनिक ठिकाणी केलेले वक्तव्य संशयाद्स्पद असल्याचा आरोप सोळंके यांनी केला असून, शासनाच्या ठरावात जरी असे लिहिले तरी संबधित गुत्तेदार नेमका किती मुरूम नेत आहे. याची माहिती प्रशासनालाही हवी जेणेकरून त्यांच्याकडून वाळू, मुरुमाचे पैसे कपात करता येईल.

परंतु हे सर्व नियम धाब्यांवर ठेउन येथील मुरूम चोरी प्रकार चालू असून या बाबत हा गुत्तेदार प्रशासनाला माहिती न देताच सर्रासपणे मुरूम चोरत आहे.  याबाबत पालकमंत्री गुत्तेदाराला सहकार्य करत मुरूम चोरीवर कारवाई करू नका अशा प्रशासनावर दबाव आणत असल्याच सोळंके यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. प्रशासनाने  मुरूम चोरी करताना जप्त केलेल्या वाहनांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. व परवानगी न घेता मुरूम चोरी करत असलेल्या वाहनावर कारवाई करावी ही मागणी सोळंके यांनी केली. याबाबत प्रशासनाने असेच दुर्लक्ष ठेवले तर आपण या प्रकरणाबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.
दरम्यान यावेळी पालकमंत्री लोणीकर यांच्यावर अनेक आरोप करत जिल्ह्यातील अनेक कामात बबनराव लोणीकर यांचा अलिखित वाटा असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोरेगाव भीमाप्रकरणी सरकारची कारवाई एकतर्फी असल्याचा आंबेडकरांचा आरोप