महान क्रांतिकारक राजगुरू हे संघाचे नसून संपूर्ण देशाचे- राजगुरुंंचे वंशज

krantivir rajguru

पुणे: महान क्रांतिकारक संघाचे नसून संपूर्ण देशाचे आहेत. त्यांना कोणत्याही उजव्या वा डाव्या विचारसरणीशी न जोडता केवळ एक क्रांतिकारी म्हणूनच पहावे, असे राजगुरु यांचे थोरले बंधू दिनकर राजगुरु यांचे नातू सत्यशील आणि हर्षवर्धन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले. क्रांतिकारक राजगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, असा खळबळजनक दावा संघाचे माजी प्रचारक आणि पत्रकार नरेंद्र सेहगल यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. त्याला आज राजगुरुंच्या वंशजांनी उत्तर दिले आहे.

हुतात्मा राजगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते आणि संघ शाखेवर जात होते, याबाबत आम्हाला कधीच सांगण्यात आले नाही तसेच हुतात्मा राजगुरु यांच्यावर अनेक पुस्तके लिहिण्यात आली. मात्र त्यामध्ये कुठेही राजगुरु हे संघ स्वयंसेवक होते अशी माहिती आढळत नाही. “हौतात्म्याच्या ८७ वर्षांनंतर यांना राजगुरुंची आठवण का आलीय? भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना कोणत्याही पक्ष किंवा संघटनेशी जोडलं जाऊ नये. ते संपूर्ण देशाचे होते.”, असे आवाहनही राजगुरुंच्या वंशजांनी केले.

सेहगल यांनी भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता या पुस्तकात संघ देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्रजांविरोधात लढताना आपल्या प्राणाची आहुती देणारे शहीद राजगुरु हे नागपूर येथील मोहिते वाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक असल्याचा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकाचे वाटप आता संघाच्या स्वयंसेवकांमध्ये केले जात आहे.

नेमकं काय म्हणाले सेहगल पुस्तकात ?

१. राजगुरु हे नागपूरच्या मोहिते वाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक होते.
२. राजगुरु हे संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे निकटवर्तीय होते.
३. डॉक्टर हेडगेवारांनी त्यांची राहण्या-खाण्याची सोय भैय्याजी दनः यांच्या घरात केली.
४. नागपुरात येऊन राजगुरु डॉक्टर हेडगेवारांना भेटले.
५. इंग्रज पोलीस अधिकारी सँडर्सला गोळ्या घातल्यावर ते लाहोर सोडून पळाले.Loading…
Loading...