युवा स्वाभिमान महोत्सवाला द ग्रेट खली व महाराष्ट्र केसरी कटके लावणार हजेरी

अमरावती – युवा स्वाभिमान संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित महोत्सवात १२ व १३ जानेवारी रोजी बडनेरा येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ या स्पर्धेमध्ये देशातील नामवंत ५०० महिला व पुरूष पहेलवान सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय रेसलर द ग्रेट खली व महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेही या स्पर्धेला हजेरी लावणार आहेत, अशी माहिती बडनेराचे आमदार रवी राणा यांनी आज,मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली़.

Loading...

युवा स्वाभिमान संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त युवा स्वाभिमान महोत्सव-२०१८ आयोजित करण्यात आला आहे़. या महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मैदानी खेळांना चालणा देण्यासाठी या महोत्सवात प्रथमच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ १२ व १३ जानेवारी रोजी दुपारी २ ते रात्री १० या काळात कुस्तीची दंगल बडनेरा येथे रंगणार आहे़ या स्पर्धेमध्ये देशातील ५०० नामवंत महिला व पुरूष पहेलवान सहभागी होणार आहेत़ आंतरराष्ट्रीय रेसलर द ग्रेट खली व महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांची उपस्थिती या स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहे़.

यावेळी महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांचा पाच किलोची चांदीची गदा व ५१ हजार रोख देवून युवा स्वाभिमान परिवाराच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे आ़मदार रवी राणा यांनी सांगितले़. महोत्सवाअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा तसेच परिस्थितीमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे़ त्याशिवाय बेरोजगारांना व्यवसायकरिता हातगाडी, कटलारिक्षा व विधवा महिलांना शिलाई मशीन, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, अपंगांना तीनचाकी सायकल व कर्णबधीरांना कर्णयंत्राचे वाटप करण्यात येणार आहे़. या महोत्सवाअंतर्गत नेत्रतपासणी, चष्मे वाटप व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन देखील करण्यात येणार आहे़.

१५ जानेवारी रोजी भातकुली येथे व १६ जानेवारीला अंजनगाव बारी येथे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे़ या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आ़मदार रवी राणा यांनी सांगितले.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...