राज्यपालांचं वर्तन पदाला शोभण्यासारखं नाही ; राजू शेट्टींनी केली टीका

raju shetti vs rajyapal

सांगली : दरम्यान, शेतकऱ्यांच्या नुकसानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राबद्दल देखील राजू शेट्टी यांनी भाष्य केलं आहे.

कोश्यारी यांचं वर्तन पदाला शोभण्यासारखं नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. तर, राज्यपाल हे एक घटनात्मक पद आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वर्तन आश्चर्य वाटणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात घटनात्मक पदांचं अवमूल्यन होताना दिसंतय. आणि हे लोकशाहीला घातक आहे, असा आरोप देखील राजू शेट्टी यांनी केला आहे.

दौरे नको, मदत करा

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याआधी राज्यात अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पाहणी करत भरीव मदतीची घोषणा केली होती. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तातडीने मदत जाहीर केली पाहिजे. तसेच शेती नुकसानीबाबत दौरे करून काही होणार नाही, असा टोला लगावत तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचं देखील राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-