‘राज्यपालांना वाटतंय ते अजूनही मुख्यमंत्रीच आहेत’ ; मलिकांचे राज्यपालांवर टीकास्त्र

nawab malik

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काही काळ थंडावलेला राज्यपाल विरोध ठाकरे सरकार हा वाद पुन्हा एका पेटला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे. राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत तर ते राज्यपाल आहेत, हे त्यांनी समजून घ्यावं, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या या दौऱ्यावरील सरकारची नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांकडून सत्तेची २ केंद्रे बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने केलेल्या कामाचे ते उदघाटन करतात सरकारला न विचारता राज्यपाल त्यांचा कार्यक्रम जाहीर करतात असं म्हणत महाविकास आघाडीने राज्यपालांच्या दौर्यावर आक्षेप घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव राजभवनावर जाऊन राज्यपालांच्या सचिवांना भेटतील आणि याना सरकारचा संदेश देतील असे नवाब मालिकांनी सांगितले.

राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते त्यामुळे आता पण त्यांना मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत असेल पण त्यांना कळलं पाहिजे कि ते मुख्यमंत्री नाहीत असा टोला मालिकांनी लगावला आहे. तसेच राज्यपालांचा हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये दौरा आहे. या तीन पैकी दोन जिल्ह्यात राज्यपाल विद्यापीठातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्याला आमचा आक्षेप नाही. मात्र या तिन्ही जिल्ह्यात ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा घेणार आहेत. त्याला आमचा विरोध आहे. हा सरकारच्या कामात हस्तक्षेप आहे. असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या