राज्यपाल-राज्य सरकार संघर्ष झाला तीव्र ,विद्यार्थ्यांची वाढली चिंता

bhagat singh koshyari

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठाची परीक्षा घ्यायची की नाही या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि राज्यपाल आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या परीक्षेऐवजी श्रेणीच्या निर्णयाला प्रलंबित ठेवत विद्यापीठ कायद्याप्रमाणे निर्णय होईल, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ कायद्याप्रमाणे घेण्यात येतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय कळवलं आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याबाबत परवानगी मागणारे पत्र लिहिले होते. त्याचवेळी परीक्षा रद्द करण्याचे संकेतही दिले होते. त्यावरून राज्यपालांनी शासनाला ‘परीक्षा रद्द करणे अव्यवहार्य आणि बेकायदा ठरेल,’ अशा आशयाचे पत्र लिहिले होते. मात्र, तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षांची परीक्षा रद्द करण्याची घोषणा रविवारी केली. त्यावर आता पुन्हा राज्यपालांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन झाला का? तरुणांच्या माथी जळीत बीए प्रमाणे कोरोना ग्रॅज्युएट बिरुदावली लागणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात अशा भयगंड निर्माण केलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधीत भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काल पत्र लिहून आमदार अँड आशिष शेलार यांनी पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते तर आज त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. शासनाने पदवी अंतीम वर्षांची परिक्षा न घेता सरासरी गुण देण्याचा व गुणसुधार कार्यक्रमात ऐच्छिक जाण्याचा तीन महिन्या नंतर त्यांची परिक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला तो सर्वसमावेशक विचार करुन घेला का? राज्यातील सर्व विद्यापीठ मिळून ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांचे काय? त्यांना प्रथम व व्दितीय वर्षात ATKT असल्याने त्यांना नापास करणार का? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत. तसेच पुर्वी एका विद्यापीठाच्या उत्तर पत्रीका असलेला खोलीला आग लागल्याने त्यावर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यांच्या शैक्षणिक करिअरला जळीत बीए असे बिरुदावली लागली. तशी दुर्दैवाने बिरुदावली आता ‘कोरोना ग्रॅज्युएट’ म्हणून लागणार का? विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांचा विचार होणे आवश्यक आहे यासाठी आज आपण राज्यपालांची भेट घेतल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

‘सरकारने पास केलेल्या विद्यार्थ्यांना ‘कोरोना ग्रॅज्युएट’ म्हणून तर संबोधले जाणार नाही ना?’

परीक्षांचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?; राज ठाकरे यांचं राज्यपालांना खरमरीत पत्र

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून टाक्स फोर्स नियुक्त करा : भाजपा