राजकीय हेतूने प्रेरित होऊन निर्णय घेणा-या राज्यपालांनी राजीनामा द्यावा – अशोक चव्हाण

मुंबई : आदर्श घोटाळा प्रकरणी राजकीय हेतूने प्रेरित होऊन निर्णय घेतला असल्याने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. आदर्श घोटाळा प्रकरणी खा. अशोक चव्हाण यांच्या विरोधात माझी चौकशी करून खटला चालवण्यास राज्यपाल राव यांनी परवानगी दिली होती.

राज्यपालांच्या त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने आज बेकायदेशीर ठरवले. या पार्श्वभूमीवर खा. चव्हाण बोलत होते. मला न्यायव्यवस्थेवर विश्वास होता आणि त्याप्रमाणे आज सत्य बाहेर आले. आदर्श घोटाळ्याचे आरोप हे माझ्याविरोधात रचण्यात आलेले राजकीय षडयंत्र होते.

मी कोणतीही चुकीची कामे केलेली नाहीत. त्यामुळेच उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मी समाधानी असल्याचेही खा. चव्हाण यांनी सांगितले