शेतकऱ्यांकडून ग्रामसभेत सरकारच्या कर्जमाफीचा निषेध

राजेंद्र साळवे . राहुरी – महाराष्ट्र सरकारने नुकतीच सरसकट कर्जमाफी जाहीर केली आहे . मात्र, जुन 2016 अखेर थकबाकी असणा-या अल्पभुधारक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.  सरकारचे हे धोरण चुकीचे वाटत असल्याने राहुरी तालुक्यातील वाबळेवाड़ी येथील शेतकऱ्यांनी विशेषग्रामसभा आयोजित करून सरकारचा निषेध केला आहे.

काल (दि२७) रोजी राहुरी व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वाबळेवाड़ी येथे विशेष ग्रामसभेचे अयोजन केले होते.राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाने सध्या शेतकऱ्यामध्ये संभ्रामवस्था निर्माण झाली आहे.  सर्वप्रथम पुणतांबा येथून शेतकरी आंदोलनाला सुरूवात झाली आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र भर हे अंदोलन चिघळले, कर्जमाफीच्या रूपाने या आंदोलनाला यशही मिळाले. शासनाने 30 जुन 2016 अखेर असणारे थकबाकीदार असणा-यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक पाहता थकबाकी असणा-या शेतक-यांची संख्या कमी असते, व नियमित कर्जदार शेतकरी जास्त असुन शासनाने या शेतक-यांवर अन्यायच केला आहे. त्यामुळे राहुरी व संगमनेर तालुक्यातील जिरायत भागातील शेतक-यांनी आज विशेष ग्रामसभा घेउन ” थकबाकीदार रहा आणि कर्जमाफी मिळवा ” अशा प्रकराची पत्रके वाटून कर्ज न भरता आपण कर्ज मुक्त झालो असे जाहीर करून शासनाचा निषेध केला आहे.

येत्या 5 दिवसांत सरकारने आपला निर्णय बदलुन सरसकट कर्जमाफी करून मार्च 2017 अखेर कर्जदार असणाऱ्या शेतक-यांचा उतारा कोरा करावा अन्यथा अंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

या झालेल्या ग्रामसभेला गावच्या सरपंच सौ.कोमल शिंदे , उपसरपंच रमेश वाबळे, शांताराम नेहे, मंड़लाधिकारी अशोक ड़ोखे, तलाठी राजेश घोरपड़े, ग्रामसेवक सौ.चोखर, एस.ड़ी.वसंत पवार , शिवाजी साकोरे, सचिन शिंदे, विलास गागरे, कमल गभाले, मथुरा वाबळे, लिलाबाई वाबळे, राजाबापु वाबळे, संदीप नेहे, आप्पासाहेब वाबळे, अरूण वाबळे,यां चे सह दोन्ही तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते