करमाळ्यात सरकार विरोधी तिरडी आंदोलन

blank

करमाळा : करमाळा या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी करमाळा तहसील येथे गेल्या 9 दिवसापासून ठिय्या आंदोलन चालू आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळा करून त्याची अंत्ययात्रा शहरातून काढण्यात आली .यावेळी मराठा समाज बांधव शाळकरी मुले यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

माढ्यातील तहसील कार्यालय बंद

माढा तहसील कार्यालयाला सकल मराठा क्रांती मोर्चा ने कुलुप घातले. कुलुप घालण्याआधी मराठा महिलांनी अधिकाऱ्यांना पुष्प देऊन विनंती केली.अधिकाऱ्यांनी देखील मराठा समाजाच्या भावनेचा आदर करित काम बंद आंदोलन केले. गेले सात दिवसापासुन माढा तहसिल कार्यालया समोर ठिय्या आंदोलन सुरु आहे. आज भोसरे जिल्हा परिषद गटाची तारीख होती. यावेळी भोसरे जिल्हा परिषद गटातील सर्व पक्षीय लोक यावेळी ऊपस्थित होते.

दरम्यान,मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारनं वर्षभर कोणतीही हालचाल केलेली नाही. मात्र सरकारसोबत कोणतीही चर्चा करायची नाही, असा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेत 9 ऑगस्टपर्यंत राज्यभर जनआंदोलन छेडलं आहे.

केंद्र सरकारचा अजब निर्णय : रमजानच्या काळात दहशतवादाविरोधात कारवाई नाही

आरक्षण आर्थिक निकषावरचं असावं, जातीय निकषावर नको – राज ठकरे