किरीट सोमय्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, वाधवान प्रकरणावर सरकार कारवाई करणारचं

मुंबई : वाधवान प्रकरणी बातमी आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करून चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकार यावर योग्य कारवाई करत आहे, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला लगावला आहे.

एका व्हिडीओद्वारे नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, वाधवान प्रकरणी बातमी आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करून चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकार यावर योग्य कारवाई करत आहे.

तसेच  भाजप नेते किरीट सोमय्या हे बेताल वक्तव्य करत आहेत. किरीट सोमय्या हे केवळ वक्तव्य करण्याचे कामाचे आहेत. ते केवळ वाक्त्वू करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळेच त्यांचे लोकसभेला तिकीट कापण्यात आले. IAS आणि IPS अधिकारी हे केंद्र सरकारच्याही आक्त्यारीत येतात. ते पण यावर करवाई करू शकतात. त्यामुळे किरीट सोमय्या जे वक्तव्य करत आहेत, ते गांभीऱ्याने घेण्याची गरज नाही, असे नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान राज्यातून कोणालाही बाहेर जायचे असेल किंवा जिल्हा बदलायचा असेल तर त्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांना होती, याची  कल्पना अमिताभ गुप्ता यांना होती. तरीदेखील त्यांनी स्वतःच्या अधिकारात वाधवान कुटुंबीयांना परवानगी दिली. ती देत असताना त्यात त्यांनी ‘फॅमिली फ्रेंड’ आहेत असा उल्लेख केला. अधिकाराचा गैरफायदा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे यावर आता  मुख्यमंत्री ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याच ठरणार  आहे.