fbpx

मुलींच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा क्रांतिकाक निर्णय घेणार सरकार

मुंबई : सरकार आगामी काळात मुलींना देखील सैनिकी शाळांमध्ये प्रवेश देण्याचा विचार करत आहे. सैनिकी शाळांमधून मुलांची एनडीए साठी तयारी करून घेतली जाते मात्र मुलींना एनडीए मध्ये प्रवेश नसल्याने सैनिकी शाळांमध्ये प्रवेश दिला जात नव्हता.जर सरकारने हा निर्णय घेतला तर मुलींच्या दृष्टीने हा सरकारचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय असणार आहे. देशात सध्या 26 सैनिक शाळा असून नवीन 21 शाळा सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.
संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी संसदेत खा.हेमंत गोडसे आणि राजीव सातव यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत सैनिकी शाळांमधून फक्त मुलांना शिक्षण दिले जात होते मात्र आगामी काळात मुली देखील सैनिकी शाळांमध्ये दिसल्यास आश्चर्य वाटायला नको