टीम महाराष्ट्र देशा: पीएम किसान सन्मान योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana) चा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत आहे. या योजनेअंतर्गत सरकार करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवत आहे. अशा परिस्थितीत अनेक अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेल्याची माहिती केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मिळत आहे. सरकार आता लवकरच या शेतकऱ्यांच्या विरोधात पाऊल उचलणार असल्याची माहिती समोर येत आहे. जे शेतकरी सरकारच्या नियमानुसार पात्र नव्हते त्यांनी खोटे कागदपत्र लावून निधीचे पैसे घेतल्याची माहिती समोर येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारी या शेतकऱ्यांविरुद्ध नोटीस पाठवून कारवाई करणार आहे.
सरकार नोटीस पाठवून पीएम किसान योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana) ची रक्कम करणार वसूल
ज्या शेतकऱ्यांनी खोटे कागदपत्र दाखवून पीएम किसान योजनेची रक्कम मिळवली आहे त्या शेतकऱ्यांना सरकार आता खुणावत आहे. कोणत्या शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रे दाखवून पीएम सन्माननिधी योजनेचा बारावा हप्ता मिळाला आहे याची सरकार आता तपासणी करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार आता शेतकऱ्यांना नोटीस पाठवून त्यांचे कागदपत्र दाखवण्यास सांगणार आहे. दरम्यान, एखाद्या शेतकऱ्यांचे बनावटी कागदपत्र सापडले तर त्यांच्याकडून बारावा हप्त्याची रक्कम परत घेतल्या जाईल.
4.50 कोटी शेतकऱ्यांना मिळाला नाही पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी देशातील 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 16000 कोटी रक्कम पाठवली आहे. पीएम किसान पोर्टल वर दिलेले आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत, 12.54 कोटीहून अधिक शेतकऱ्यांची नाव नोंदले गेले आहेत. दरम्यान, पीएम मोदी यांनी फक्त 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले होते. अशा परिस्थितीत 4.50 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोचलेले नाही. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचले नाही केंद्र सरकार त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.
यामुळे शेतकऱ्यांना नाही मिळाला पी एम किसान योजनेचा 12 वा हफ्ता
पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत बारावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनाही ई-केवायसी करणे अनिवार्य होते. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नव्हते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात बारावा हप्ता पोहोचला नाही. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा खाते क्रमांक, आधार क्रमांक, खाते क्रमांक वरील नावाची स्पेलिंग, इत्यादी गोष्टींमध्ये चुका आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील पैसे पोहोचले नाही.
महत्वाच्या बातम्या
- Navneet Rana । “कुणाला आळशी माणूस बघायचा असेल, तर मातोश्रीवर…”; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- Box Office Released | आज बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालण्यास सुसज्ज आहेत ‘हे’ 3 चित्रपट
- MNS | “ऊ.बा.ठा गुजरात निवडणूक लढवणार? की…”; मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
- Jayant Patil | “…त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार”; जयंत पाटील यांचं मोठं विधान
- Arvind Sawant | “महाराष्ट्रासाठी घोषणा होत आहेत म्हणजे…”; अरविंद सावंतांनी वर्तवलं भाकित