शासनाच्या वतीने पूरबाधित कुटुंबांना मिळणार तीन महिने मोफत धान्य

टीम महाराष्ट्र देशा :- कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूराच पाणी ओसरल्यानंतर आता जनजीवन पूर्व पदावर येत आहे. त्यामुळे गेल्या आठ-नऊ दिवसांपासून निवारा केंद्रात असलेले पूरग्रस्त लोक आता परत आपापल्या घरी परतत आहेत. त्यामुळे आत्ता निवारा केंद्राची संख्या हळूहळू कमी होत आहे.

शासनाकडून कडून पूरग्रस्तांना आत्तापर्यंत १९ कोटी ७८ लाख २० हजार इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले आहे. पूरग्रस्त ४७४ गावांतील ९४ हजार २७४ एवढी पूरग्रस्त कुटुंबांची संख्या आहे. शासनाच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबांना मोफत धान्य वाटपही सुरू केले आहे. तसेच पूरबाधित कुटुंबांना आणखी तीन महिने धान्य मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

रविवार अखेर ४१ हजार ४९५ कुटुंबांना गहू व तांदूळ प्रत्येकी दहा किलो याप्रमाणे ८२९.९० मेट्रिक टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे. धान्य वाटपाच्या कालावधीत बदल केला असून पूरबाधित कुटुंबांना आणखी तीन महिने धान्य मोफत दिले जाणार आहे. त्यामुळे पूरबाधीत कुटूंबांना पुढील काही महिने चिंता करण्याची गरज नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहेशासनाच्या वतीने पूरबाधित कुटुंबांना प्रत्येकी 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ देण्यात येत असून, हे धान्य अजून पुढचे तीन महिने मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

IMP