सरकारला आता राज्य चालवणं अवघड होईल – उत्तम जानकर

पुणे: महाराष्ट्रात राहणाऱ्या दिड कोटी धनगर समाजाला गेल्या 70 वर्षापासून अारक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं आहे, यासाठी अस्तित्वात नसणारी धनगड अादिवासी जमात उभी करण्यात आली आहे. 2014 साली राज्यातील धनगर समाजाने अारक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्र्यावर ठाम विश्वास ठेवून भाजपला निवडणून दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अारक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा टिसच्या माध्यमातून धनगरांना अारक्षण मिळूच नये अशी कायदेशीर तयारी केल्याचा अारोप उत्तम जानकर यांनी केला आहे. तसेच धनगर समाजाच्या आरक्षणावर मार्ग न निघाल्यास सरकारला राज्य चालवणं अवघड होईल असा इशारा त्यांनी दिला आहे आहे.

गेल्या तीन वर्षापासून राज्यातील सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी, जातपडताळणी समिती, अादिवासी मंत्रालयाकडून माहिती अधिकारात माहिती घेतली असता एकही धनगड अाढळून अाला नाही. दरम्यान, धनगर समाजाला अारक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून 93 हजार धनगड, तर एकूण 19 लाख 50 हजार बोगस अादिवासी दाखविले अाहेत. यावर अादिवासी समाजाने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न मिळणारे 9.5 अामदार, तर 30 टक्के अनुदान अाणि 30 टक्के नोकऱ्या या इतर समाजाच्या बोगसगिरी करुन हडपल्या अाहेत, त्यामुळे सर्व अादिवासी मंत्री, अामदार व बोगस लाभधारक व नोकरीधारकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जानकर यांनी यावेळी केली.

समस्त धनगर समाजाच्या वतीन सरकारला हा अंतिम इशारा असून सरकारने राज्यात एकतरी धनगड दाखवावा अन्यथा 1 सप्टेंबर 2018 पूर्वी महाराष्ट्रातील धनगरांना एसटीचा दाखला द्यावा, अशी मागणी जानकर यांनी यावेळी केली.

दूध उत्पादकांना आता मोबदला थेट बँक खात्यात

शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती झाला पाहिजे – महादेव जानकर