सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, कालबद्ध आणि निश्चित वेळेत आरक्षण देऊ : मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणावरुन निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सरकारनं आज मराठा समाजातील मान्यवरांची बैठक बोलावली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असून कालबद्ध आणि निश्चित वेळेत आरक्षण देऊ, अशी ग्वाही गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सह्याद्री अतिथीगृहात मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित मान्यवरांच्या बैठकीतील चर्चेनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर कुठल्याही आदोलनादरम्यान हिंसा होऊ नये तसेच आत्महत्येचे पाऊल कोणीही उचलू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

केंद्राच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान कसे देते?