मावळ घटनेला सरकार जबाबदार नव्हतं; शरद पवारांनी सांगितली मावळ कथा

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथील शेतकऱ्याला केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने गाडीच्या भरधाव वेगाने चिरडलं. त्या दुर्घटनेत त्या निष्पाण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यावरुन देशात संतापाची लाट उसळली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने यावरुन महाराष्ट्र बंदची हाक देत संपूर्ण महराष्ट्र बंद केला. त्यावरुन राज्यातील विरोधी पक्ष भाजपमधील नेत्यांकडून मावळ घटनेचे दाखले देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करण्यात आली. त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे.

मावळमध्ये काय झालं असा आरोप भाजपने केला. त्यांना सांगायचं आहे. त्यावेळी शेतकरी मृत्यूमुखी पडले त्याला जबाबदार राजकीय पक्ष किंवा नेते नव्हते. त्यावेळी आरोप पोलिसांवर होते. माजी गृहमंत्री यांनी-लखीमपूर घटनेशी तुलना केली. परंतु हे लक्षात घ्यावं की मावळ घटनेवरून लोकांना हे माहीत झालं की या घटनेला सरकार जबाबदार नव्हतं तर स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे हे स्पष्ट झालं आहे, असं ते म्हणाले. मावळच्या घटनेबाबत ज्यावेळी लोकांना कळलं त्यानंतर हे स्पष्ट झालं की सरकार याला जबाबदार नव्हतं. त्यामुळेच मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार 90 हजार मतांनी निवडून आले आहेत, असं शरद पवार म्हणाले.

मावळमध्ये आता चित्र बदललं आहे. लोकांना वस्तुस्थिती कळाली आहे. माझ्या जिल्ह्यातील तालुका असल्यामुळे सांगत, मावळ तालुक्यात सातत्यानं जनसंघ, नंतर भाजप होतं. रामभाऊ म्हाळगी हे नेहमी मावळचे प्रतिनिधी होते, असंही पवार म्हणाले. इतकंच नाही तर मावळमध्ये लोकांना भडकावण्याचं काम कुणी केलं हे लक्षात आल्यानंतर त्या मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. सुनील शेळके हे 90 हजाराच्या फरकानं निवडून आले आहेत. मावळमध्ये संताप असता तर एवढ्या फरकानं राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला नसता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळची स्थिती समजून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टोलाही पवारांनी लगावला आहे

काल जे जवान शहीद झाले अशाप्रकारे मागच्या काही दिवसांत सातत्याने आशा बाबी घडत आहेत. त्यासाठी इतर पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन बोलायला हवं. केंद्र सरकार काही संस्थांचा सातत्याने गैर वापर करत आहे. यामध्ये सीबीआय, ईडी, एनसीबी आशा संस्थांचा वापर करत आहे. काही उदाहरणे सांगायचं झालं तर अनिल देशमुख यांचे उदाहरण घेता येईल. देशमुख यांच्याबाबत मागच्या पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले आणि त्यामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. ज्यांनी आरोप केले ते आता कुठं आहेत हेच माहिती नाही.ईडी, सीबीआयच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या